Talegaon Dabhade News : सोमाटणे फाटा येथील बसथांब्याची दुरावस्था

एमपीसी न्यूज – पुणे- मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे प्रवाशांसाठी पीएमपीएमएलचा एकमेव बसथांबा आहे. ह्या  बसथांब्याची खूपच दुरावस्था झाली आहे. बसथांब्याच्या निवारा शेडवरील पत्रे गायब झाले असून  पाणी वाहून जाण्यासाठी  बसथांब्या समोरच चर खोदला असल्याने त्यात पाणी साचते. 

त्याठिकाणी सांडपाण्याचे डबके झाल्याने प्रवाशांना बसमध्ये चढताना खूपच अडचणीचे होते. त्याचबरोबर उन्हाळ्यात प्रवाशांना मुख्य रहदारीच्या रस्त्यावर धोकादायक पद्धतीने बसथांब्यापासून दुर बाजुला बसची वाट पाहत ताटकळत उभे थांबावे लागते.

प्रवाश्यांना बसमध्ये चढायला खूप अडचण होत असल्याने, घाईघाईने चढताना पडू शकतो. आणि अपघाताचा धोका संभावतो यात प्रवाश्यांचे हाल होत आहे. त्यामुळे  उन्हाळा,  पावसाळा आणि कोरोनाळा हे तिन्ही ऋतू चालू असून प्रवाशांना कुणी वाली राहीला नसल्याची चर्चा नागरीकांमध्ये आहे.

पलिकडील बाजूस वाहतुक नियंत्रण पोलिस चौकीसमोरील बसथांबाच गायब झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था अथवा पीएमपीएमएल प्रशासनाने दोन्ही बाजूकडील सुसज्ज नवीन बसथांबे लवकरात लवकर उभारावेत अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.