Badminton : अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन स्पर्धेत अनन्या गाडगीळला दुहेरी मुकुट

एमपीसी न्यूज – हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन (Badminton) कप अजिंक्यपद स्पर्धेत अनन्या गाडगीळने दुहेरी मुकुट मिळवला. तिने 17 आणि 19-वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले.

पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन (Badminton) कोर्टवर ही स्पर्धा झाली. स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित अनन्याने ओजल रजकवर 15-8, 15-7 अशी 16 मिनिटांत मात केली आणि विजेतेपद पटकावले. यानंतर अनन्याने 19 वर्षांखालील मुलींच्या गटाच्या अंतिम फेरीत श्रेया शेलारवर 15-17, 15-11, 15-9 अशी 39 मिनिटांत मात केली आणि दुहेरी मुकुट मिळवला. 16 वर्षीय अनन्या ही केळकर अकादमीत नीता केळकर यांच्याकडे सराव करते.

New Year Photography Contest : नववर्षाच्या स्वागताचा फोटो क्लिक करा आणि जिंका चांदीची आकर्षक भेटवस्तू!

स्पर्धेतील अकरा वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत सिबतैनरझा सोमजीने मीर शहझार अलीवर 15-5, 15-5 अशी बारा मिनिटांत मात केली आणि विजेतेपद पटकावले. अकरा वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित ख्यात्री कत्रेने अपेक्षेप्रमाणे जेतेपद पटकावले. तिने दुसऱ्या मानांकित तेजस्वी भुतडावर 15-3, 15-3 अशी मात केली. यानंतर 13 वर्षाखालील मुलांच्या गटात अरहम रेडासनीने बाजी मारली.

अग्रमानांकित अरहमने चौथ्या मानांकित कपिल जगदाळेला 15-7, 15-7 असे पराभूत केले. तेरा वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित शरयू रांजणेने जेतेपद मिळवले. तिने विजेतेपदाच्या लढतीत दुसऱ्या मानांकित सोयरा शेलारला 16-14, 15-11 असे 22 मिनिटांत पराभूत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.