Pune : लघुवाद न्यायालयातील बेलीफास अडीच लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – मिळकतीचा ताबा देण्यासाठी शिवाजीनगर येथील लघुवाद न्यायालयातील बेलिफाला अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

मनोहर रूद्राप्पा कांबळे, (वय ४८ वर्षे, नोकरी – वेलीफ, लघुवाद न्यायालय, शिवाजीनगर, पुणे), असे या बेलीफाचे नाव आहे.

लघुवाद न्यायालयाने तक्रारदार यांच्या मिळकतीचा ताबा देण्याचे आदेश दिले होते. मात्र, यामध्ये तक्रारदार यांची हरकत नोंदवून मदत करण्यासाठी तक्रारदार यांना दोन लाख 50 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले असता लाचलुचपत विभागने सापळा रचून पुणे महानगरपालिकेजवळ अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. यावेळी दोन हजार रुपयांच्या 15 नोटा याप्रमाणे 30 हजार रुपये तर उरलेल्या दोन लाख वीस हजार रुपयांच्या नकली नोटा सापळा लावताना तक्रारदारामार्फत पोहोचवण्यात आल्या होत्या. या नोटा पुणे महापालिकेजवळील पेट्रोल पंपाजवळ स्वीकारताना मनोहर कांबळे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून  शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्यावाबत लाचलुचपत प्रतिबंधक विमाग पुणे कार्यालयास संपर्क साधण्याबाबतचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.