Maval : बजरंग दलाच्या पुढाकाराने व लोणावळा ग्रामीणच्या सहकार्याने गडावर पर्यटकांसाठी लावले सावधानतेचे सूचना फलक

एमपीसी न्यूज – विश्व हिंदु परिषद, बजरंग दल व लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतीने शनिवारी(27) किल्ले लोहगड, किल्ले विसापूर, किल्ले तुंग, किल्ले तिकोणा गडावर सूचना फलक लावण्यात आले.

ऐतिहासिक वारसा असलेल्या मावळ तालुक्यातील गड किल्ल्यांवर गेल्या काही दिवसांपासून अनुचित प्रकार घडत आहे. त्यामध्ये गडावर मद्दपान करणे, अश्लिल चाळे करणे, गडावरील तलावात पोहणे, गडावर सिगरेट ओढणे असे प्रकार घडू नये. गडाचे पावित्र्य नष्ट होत आहे. त्याचं पार्श्वभूमीवर बजरंग दलाने शनिवारी व रविवारी या गोष्टींना प्रतिबंध लागला पाहिजे म्हणून किल्ले लोहगडवर किल्ले संवर्धन मोहीम अंतर्गत ठोक मोहीम आयोजित केली होती. मात्र ती माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना कळल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरिक्षक दीपक लुकडे यांनी चर्चा केली व आवश्यक ती सर्व खबरदारी व प्रतिकात्मक उपाय करण्याचे आश्वासन दिले. त्याचाच भाग म्हणून शनिवारी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल व लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतीने किल्ले लोहगड, किल्ले विसापूर, किल्ले तुंग, किल्ले तिकोणा गडावर सूचना फलक लावण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

लोहगड व विसापूर गडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. यामुळे दोन पोलीस कर्मचारी वाढवून चेक नाका ही करण्यात आला. त्यामुळे  जर कोणी दारु घेऊन गडावर जात असेल तर त्याला प्रतिबंध लाभेल व यामुळे गडावर घडणा-या घटनांनाही आळा बसणार आहे. गडावर गैर प्रकार घडू नये यासाठी बजरंगदलाचे कार्यकर्ते दर शनिवारी व रविवारी पोलिसांच्या सोबत गडावर असणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरिक्षक दीपक लुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशाल जांभळे, संतोष शेळके, योगेंद्र जगताप, शकील शेख यावेळी उपस्थित होते. तर सोलापूर विभाग संयोजक संदेश भेगडे, पुणे जिल्हा मंत्री अमित भेगडे, मावळ तालुका संयोजक प्रशांत ठाकर, सचिन शेलार,भास्कर गोलिया, सुभाष भोते, सुधिर दहिभाते, विश्वास दळवी, साई डांगले उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.