Pimpri: चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होईल – महापौर जाधव

तीन दिवसीय बाल चित्रपट महोत्सवाला सुरुवात

एमपीसी न्यूज – पुढच्या काळातील देशाचे भविष्य विद्यार्थी आहेत. चित्रपटांच्या माध्यमातून त्यांना सत्य-असत्याची जाणीव व्हावी. सत्याला समोरे जाऊन विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भवितव्य घडवावे, असे मार्गदर्शन महपौर राहुल जाधव यांनी विद्यार्थांना केले. तसेच चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास वाढण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. 

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि फोर्ब्स मार्शल प्रा.लि. यांचे संयुक्त विद्यामाने आज शुक्रवार (दि. 23)ते रविवार (दि.25 ) नोव्हेंबर 2018 या दरम्यान आयोजित केलेल्या बाल चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्निवल सिनेमा, चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमास सहशहर अभियंता प्रविण तुपे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, फोर्ब्स मार्शल प्रा.लि.कंपनीच्या संचालिका रती फोर्ब्स, सीएसआरच्या बिना जोशी, प्रशासन अधिकारी पराग मुंढे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी रमेश भोसले, बाल
चित्रपट तज्ञ प्रसन्ना हुलकवी, पीसीएमसीसीएसआरचे विजय वावरे व बहुसंख्येने विद्यर्थी, विद्यर्थीनी व पालक उपस्थित होते.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘या बाल चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास वाढण्यास मदत होईल. या बाल चित्रपट महोत्सवाच्या कार्यशाळेतून चित्रपट कसे बनविले जातात. या बद्दलचे ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होईल. पडद्यामागील सत्यही विद्यार्थ्यांना कळेल’.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशहर अभियंता प्रविण तुपे यांनी केले. सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले. तर, सीएसआरच्या बिना जोशी यांनी आभार  मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.