Talegaon Dabhade : वाढदिवसानिमित्त सावरकर गुरुकुल संस्थेला धान्य वाटप

एमपीसी न्यूज – माजी मंत्री बाळा भेगडे यांचे सहकारी साजिद शेख यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गुरुकुल संस्थेला धान्य वाटप करण्यात आले. माजी मंत्री बाळा भेगडे व जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन महिन्याचा किराणा संस्थेला देण्यात आला.

याप्रसंगी शहराध्यक्ष रविंद्र माने,नगरसेविका प्राची हेंद्रे,नगरसेवक अरुण भेगडे, प्रदीप हुलावळे,मुन्ना मोरे,नितीन पोटे, विनोद तथा बंटी भेगडे, आशुतोष हेंद्रे, प्रदीप टेकवडे, जालिंदर भेगडे, सतीश राऊत, सुभाष जाधव, सागर शिंदे, उपेंद्र खोल्लम, जमीर नालबंद, सोहेल शिकीलकर, मन्सूर शाह,जावेद शेख, अय्याज नालबंद, विशाल भेगडे, विकास घारे, करण गोणते, गुरुकुल संस्थेचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गुरुकुल येथे गरीब कुटुंबातील मुले शिक्षणासाठी राहत असून मावळ तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्तींच्या वतीने संस्थेला मदत होत असते. गुरुवार (दि 25) साजिद शेख यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनावश्यक खर्चाला फाटा देत, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गुरुकुल येथे माजी मंत्री बाळा भेगडे व जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन महिन्याचा किराणा संस्थेला देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.