Vadgaon Maval : आगामी निवडणुकांमध्ये तालुक्यात भाजपचाच झेंडा – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – पुढील काही महिन्यांत येऊ घातलेल्या तळेगाव,लोणावळा नगरपरिषद, पुणे जिल्हा परिषद आणि मावळ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वत्र भाजपाचाच झेंडा फडकेल”, असा विश्वास माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केला. वडगाव मावळ येथे मावळ तालुका भाजपाची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

 

 

भेगडे म्हणाले की, “महिन्याभरापूर्वी राज्यातील मविआचे भ्रष्ट सरकार पायउतार होऊन जनहिताचे निर्णय घेऊन त्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले आहे, त्यामुळे पुढील काळात कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा उत्साहाने तयारीला लागून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाला विजयी करण्यासाठी सज्ज व्हावे व तालुक्यातील मागील अडीच वर्षांतील भ्रष्ट राजवट उलथून टाकावी”.

 

 

आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतात मागील अडीच वर्षांत काम करत असताना सत्ताधाऱ्यांकडून झालेला त्रास कथन केला तसेच पुढील काळात करावयाच्या कामांसंदर्भात सूचना मांडल्या.

 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाची यावेळी माहीती देण्यात आली व या अभियानाच्या तालुका संयोजकपदी पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांची निवड करण्यात आली.

 

सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने बुथ सशक्तीकरण अभियानाची माहिती युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे यांनी दिली. यावेळी महागाव गावचे सरपंच सोपान सावंत यांनी कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला.तसेच शिवलीच्या सरपंचपदी अलका आडकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

Mahesh Landghe : मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या – महेश लांडगे

 

 

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्रआप्पा भेगडे, माजी सभापती निवृत्ती शेटे,जेष्ठ नेते माऊली शिंदे, जेष्ठ नेते शांताराम काजळे, प्रभारी भास्करआप्पा म्हाळसकर, जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, ज्येष्ठ नेते दत्ता गुंड, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन  मराठे, अलकाताई धानिवले, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, पीएमआरडी सदस्य कुलदीप बोडके, ता.सरचिटणीस सुनील चव्हाण,मच्छिंद्र केदारी,कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, माजी सभापती ज्योती शिंदे, माजी जिल्हापरिषद सदस्य सुमित्रा जाधव,युवानेते रवि शेटे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,सोशल मीडिया प्रमुख सागर शिंदे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे यांच्यासह तालुका कार्यकारणी चे सदस्य तालुक्यातील भाजपाचे सर्व शक्ती केंद्र प्रमुख, सर्व बूथ अध्यक्ष, सर्व गावातील प्रमुख पदाधिकारी- कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सूत्रसंचालन सरचिटणीस सुनिल चव्हाण यांनी केले.कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.सरचिटणीस मच्छिंद्र केदारी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.