Maval : डिसेंबर अखेरपर्यंत देहूरोड उड्डाणपूलाचे उर्वरित काम मार्गी लावणार – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – देहूरोड उड्डाणपूलाच्या उर्वरित कामासंदर्भात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शुक्रवारी (दि.१५) संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

_MPC_DIR_MPU_II

याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रशांतआण्णा ढोरे, देहूरोड शहराध्यक्ष कैलास पानसरे, देहूरोड कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष रघुवीर शेलार, नगरसेवक राहुल बालघरे, विशाल खंडेलवाल, बाबूलाल गराडे, MSRDC कार्यकारी अभियंता सावंत साहेब, अभियंता वाघ साहेब तसेच या भागातील नागरिक उपस्थित होते.

या उड्डाणपुलाचे उर्वरित काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात व उर्वरित काम लवरकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका करावी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.