BNR-HDR-TOP-Mobile

भोसरी येथील बालाजी ट्रेडर्समध्ये होलसेल भावात मिळणार सर्व प्रकारचे तांदूळ, गहू, डाळी व कडधान्य

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- वर्षभराच्या साठवणीसाठी सर्व प्रकारचे तांदूळ, गहू, डाळी व कडधान्य होलसेल भावात मिळण्यासाठी भोसरी येथे बालाजी ट्रेडर्स या दुकानाची स्थापना झाली आहे. या साठवणीच्या वस्तू आता बालाजी ट्रेडर्स येथे मार्केटयार्डात ज्या किंमतीत मिळतात त्याच दरात आता भोसरी मध्ये मिळू शकतील. म्हणजेच पर्यायाने मार्केटयार्डात जाणे व तेथून या सर्व वस्तू आणणे ही कटकट नाहीशी झाली. आहे. वाजवी दरात घराशेजारी सर्व साठवणीच्या वस्तू मिळू शकणार आहेत.

पावसाळ्यात घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे घरातील साठवणीच्या वस्तू गृहिणी उन्हाळ्यात भरुन ठेवतात. पूर्वी घरे मोठी होती. घरात माणसे देखील भरपूर असत. तसेच सर्व प्रकारची धान्ये सहदगत्या कधीही उपलब्ध होत नसत. त्यामुळे उन्हाळ्यात या सर्व वस्तू व्यवस्थित भरुन ठेवल्या की गृहिणीला समाधान असे. आता ते दिवस गेले असले तरी आजही पावसाळ्याचे चार महिने लागणारे धान्य नीट वाळवून, साफ करुन घरी भरले जाते. कारण आत्ता नवीन धान्य आलेले असते. त्याचा दर्जा उत्तम असतो. तसेच त्याचे दरदेखील योग्य असतात. शिवाय हे धान्य घरात भरलेले असले की पावसाळ्यात एखादे वेळी पाऊस जरा जास्त लांबला आणि बाजारात जाणे शक्य झाले नाही तर मग काय करायचे याची चिंता घरातील गृहिणीला असते.

त्यामुळे आजदेखील ब-याच घरांमध्ये पावसाळ्याची धान्याची बेगमी करुन ठेवली जाते. यात मग तांदूळ, गहू, डाळी व कडधान्ये मोठ्या प्रमाणावर भरली जातात. मात्र यासाठी एखाद्या मोठ्या दुकानातील खात्रीचे सामान निवडले जाते. लोकांची हीच मानसिकता ओळखून पुण्यातील मार्केटयार्डात अनेक दुकानांमध्ये साठवणीचे धान्य मिळण्याची सोय आहे. मात्र यात जाण्यायेण्यात पैसे व श्रम वाया जातात. त्यासाठी मुद्दाम वेगळा वेळ काढावा लागतो. लोकांचे हेच सर्व श्रम कमी व्हावेत या उद्देशाने भोसरी येथे बालाजी ट्रेडर्सची स्थापना झाली असून या दुकानात मार्केटयार्डाच्या किंमतीत धान्य मिळणार आहे.

योग्य भाव, उत्तम प्रतीचा माल. व्यवस्थित वजन आणि सस्मित ग्राहक सेवा ही बालाजी ट्रेडर्सची खासियत आहे. सर्व किराणा माल उत्कृष्ट व निवडक मिळेल. कुठल्याही कंपनीचा माल कमी घेतला तरी डझनाच्या भावातच दिला जाईल. कुठलेही खाद्यतेल व तूप शुद्ध दिले जाईल. सर्व प्रकारचे मसाले व सुकामेवा योग्य भावात मिळेल. तसेच कॉस्मेटिक्स देखील वाजवी भावात मिळतील. याशिवाय पाच किमीच्या परिसरातील नागरिकांना फ्री होम डिलीव्हरी देण्यात येईल. तसेच कमीत कमी तीन हजार व त्यापुढील किंमतीचे सामान घेतल्यास देखील घरपोच सेवा मिळेल.

याशिवाय या दुकानाची आणखी एक खासियत आहे. सध्या आपण घराबाहेर पडलो आपल्याला पहिला प्रश्न पडतो तो पार्किंग कुठे करायचे. येथे हे पार्किंग तुम्हाला मोफत उपलब्ध आहे. प्रशस्त व मोफत पार्किंगची सोय येथे येणा-या ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच आपली सामानाची यादी जर व्हॉटसअॅपवर पाठवली तर ती देखील स्वीकारली जाईल. नव्या युगाची नवी सोय अशा रितीने ग्राहकांसाठी देण्यात आली आहे अशी माहिती बालाजी ट्रेडर्सचे श्री. रामकिशोर व मांगीलाल यांनी या निमित्ताने दिली.

व्हॉटसअॅप नंबर – 9022170519
दुकानाचा पत्ता – सर्व्हे नं. 198, रोशन गार्डनजवळ, धावडे वस्ती, भोसरी, पुणे – 39.
मोबाईल नंबर – 7568786368.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.