Pune News: इंग्रजी विषय तज्ञ बाळासाहेब आल्हाट यांना राज्यस्तरीय महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

एमपीसी न्युज : महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमी महाराष्ट्र यांच्यावतीने राज्यभरातील निवडक शिक्षक-शिक्षिका महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आले.

Alandi News : प्रक्षाळपूजेनिमित्त माऊली मंदिरात समाधीवर जलाभिषेक करण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी

यावेळी इंग्रजी तज्ञ बाळासाहेब आल्हाट यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.बाळासाहेब आल्हाट हे सध्या पिंपरी चिंचवड मनपाच्या भोसरी येथिल छञपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणुन कार्यरत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे महात्मा फुले इतिहास अकादमी,राष्ट सेवा समूह व रयत प्रकाशनने केले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन ज्ञानेश महाराज,डाॅ.जितेंद्र आव्हाड,खासदार राजू शेट्टी,डाॅ.पी.ए.इनामदार,अॅड.
श्रीकांत शितोळे, डाॅ.श्रीमंत कोकाटे तसेच स्वागताध्यक्ष डाॅ.सी.टी.कुंजीर होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डाॅ.श्रीमंत कोकाटे यांनी केले. संयोजन लहुजी लांडगे, रवींद्र ढमढेरे, प्रा.सोमनाथ गोडसे, प्रा.डाॅ.सारिका बहिरट, रमेश बाडे, प्रा.औंदूबर लोंढे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.