Balasaheb Thackeray Birth Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी साधणार संवाद

एमपीसी न्यूज: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी रोजी जयंती असून या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत. या निमित्ताने बऱ्याच दिवसांनंतर उद्धव ठाकरे हे पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख शिवसैनिकांना कोणता कानमंत्र देणार याकडे साऱ्यांचे लक्ष  लागले .

दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली बाळासाहेबांची जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज्यभरात शिवसैनिकांकडून विविध कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये रक्तदान शिबिरे आणि इतर सार्वजनिक उपक्रमांचा प्रामुख्याने समावेश असतो.

या निमित्ताने वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आगामी काही दिवसांत जाहीर होण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.