Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षपदी बाळासाहेब ऊ-हे

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षपदी बाळासाहेब ऊ-हे यांची निवड करण्यात आली तर सचिवपदाची सुत्रे देवेंद्र माताडे यांच्याकडे देण्यात आली आहे. 

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचा पदग्रहण समारंभ रविवार (दि. २१) पिंपरी येथे  पार पडला.  यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनची  2019-2020 या  वर्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी डिस्ट्रिक्ट गर्व्हनर रवी धोत्रे, माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते.  यावेळी या कार्यकारिणीमध्ये नवीन अध्यक्ष बाळासाहेब ऊ-हे, सचिव  देवेंद्र माताडे,  सहसचिव रवींद्र भावे, माजी अध्यक्ष सदाशिव काळे, नियोजित पुढील अध्यक्ष देवेंद्र माताडे, खजिनदार आनंद सूर्यवंशी,  क्लबचे  अॅडमीन डायरेक्टर अशोक शिंदे,  कार्यक्रम अधिकारी वर्षा पांगारे, सीएसआर तन्सीम शेख, क्रीडा अधिकारी दामोदर वाडकर, फंड रेजिंग रामभाऊ भोसले, न्यू जनरेशन कविता चंदनानी, आयटी रवींद्र भावे,  सार्वजनिक प्रतिमा संतोष जाधव, आयटी डायरेक्टर रवींद्र  भावे, मेंबरशीप डायरेक्टर संतोष भालेकर, मेडिकल प्रोजेक्ट महादेव शेंडकर, टीआरएफ गीता जोशी, ग्लोबल ग्रान्ट अनिल नेवाळे, क्लब ट्रेनर दिनानाथ जोशी, सर्जंट आर्म्स भाऊसाहेब पांगारे, डायरेक्टर  विदाऊट पोर्टपोलिओ  राजेश अभंग आदींचा समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_II

मावळते अध्यक्ष सदाशिव काळे यांच्याकडून बाळासाहेब ऊ-हे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.  बाळासाहेब ऊ-हे म्हणाले की,  रोटरी क्बल ऑफ  पिंपरी टाऊनच्यावतीने पुढील वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.  या क्लबच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्य करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलकनंदा माताडे व रश्मी पेशवानी यांनी केले. आभार देवेंद्र माताडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.