Pimpri News : बाळासाहेबांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुखपदी निलेश तरस

एमपीसी न्यूज – बाळासाहेबांची शिवसेनेच्या मावळ जिल्हाप्रमुखपदी बाळासाहेब वाल्हेकर तर पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी निलेश तरस यांची निवड करण्यात आली आहे. (Pimpri News) पिंपरी-चिंचवड युवासेना प्रमुखपदी विश्वजीत बारणे, महिला संघटिकापदी सरिता साने आणि युवती विस्तारक पदी शर्वरी गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर, मावळ तालुकाप्रमुखपदी राजेश खांडभोर यांची नियुक्ती केली. बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (बुधवारी) पदाधिकारी जाहीर केले. 200 पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी विविध संघटनेतील पदाधिका-यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

बाळासाहेबांची शिवसेनेचा पदाधिकारी नियुक्ती मेळावा खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑटो क्लस्टर येथे पार पडला. उपनेते, कामगार नेते इरफान सय्यद उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पिंपरी, चिंचवड आणि मावळचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले.

पिंपरी-चिंचवडच्या उपजिल्हाप्रमुखपदी राजेश वाबळे, मावळच्या उपजिल्हाप्रमुखपदी शरद हुलावळे, मावळ जिल्हा संघटकपदी अंकुश देशमुख, पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुख बशीर सुतार, दत्तात्रय भालेराव, पिंपरी विधानसभा प्रमुखपदी रुपेश कदम, चिंचवड विधानसभा प्रमुखपदी सुरेश राक्षे, पिंपरी-चिंचवड शहर संघटकपदी सोमनाथ गुजर, रवींद्र ब्रम्हे, हाजी शेख, पिंपरी विधानसभा संघटकपदी सय्यद पटेल,(Pimpri News) उपविधानसभा संघटकपदी शरद मुळे, अॅड. मुकुंद ओव्हाळ, नामदेव घुले, पिंपरी विधानसभा संघटकपदी नरेश टेकाडे, संदीप पवार, निखील येवले, पिंपरी विधानसभा समन्वयक सुनील पाथरमल, अॅड. दिलीप पाटील, रुपेश चांदेरे, चिंचवड उपविधानसभा संघटकपदी राजेश अडसूळ, अंकुश कोळेकर, प्रशांत कडलग, महेश कलाल, चिंचवड विधानसभा संघटकपदी रोहिदास दांगट, संतोष बारणे, सुदर्शन देसले, चिंचवड विधानसभा समन्वयकपदी प्रदीप दळवी, हेमचंद्र जावळे, मयूर तरस, प्रसिद्धी प्रमुखपदी सागर पाचारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Chikhali News : महापुरुषांचा अवमान करणा-यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे ‘कडेलोट’ आंदोलन

मावळ तालुकाप्रमुखपदी राजेश खांडभोर, देहू शहर प्रमुखपदी सुनील हगवणे, मावळ तालुका संघटकपदी सुनील उर्फ मुन्ना मोरे, तळेगाव दाभाडे शहरप्रमुखपदी दत्तात्रय भेगडे, वडगावच्या शहरप्रमुखपदी प्रवीण ढोरे, मावळ उपतालुकाप्रमुखपदी धनंजय नवघणे यांची नियुक्ती करण्यात आली.  मावळच्या उपजिल्हा संघटिकापदी शैला पाचपुते, पिंपरी-चिंचवड शहर संघटिकापदी सरिता साने, उपशहर संघटिकापदी विमल जगताप, दिपाली गुजर, पिंपरी विधानसभा संघटिकापदी शैला निकम, चिंचवड विधानसभा संघटिकापदी शारदा वाघमोडे, पिंपरी विधानसभा उपसंघटिकापदी अश्विनी खंडेराव, संगीता कदम, सुनिता भंगाळे, अनुजा शिंदे, चिंचवड विधानसभा उपसंघटिकापदी अंजली चव्हाण, सुनिता चंदने, पुष्पलता गायकवाड, पिंपरी विधानसभा संघटिकापदी रश्मी बल्ला, अपर्णा आगाशे, आरती जगताप, शाहीन पटेल, सुवर्णा गवळी, नेहा साठे, दिपाली सुर्यवंशी, सुनीता बांबळे, पूनम बोराडे, चिंचवड विधानसभा संघटिकापदी मनीषा कारके, नूरजहाँ शेख यांची नियुक्ती करण्यात आली.

युवासेना शहरप्रमुखपदी विश्वजीत बारणे, युवा सेना उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर जगताप, युवासेना शहर संघटकपदी राजेंद्र तरस, चिंचवड विधानसभा संघटकपदी मंदार यळवंडे, पिंपरी विधानसभा संघटकपदी निलेश हाके, युवा सेना चिंचवड उपशहर संघटकपदी सागर बारणे, चिंचवड विधानसभा संघटकपदी राहुल पलांडे, पिंपरी विधानसभा युवा सेना समन्वयकपदी केदार चास्कर, चिंचवडच्या युवासेना समन्वयकपदी अभिजीत पाटील, शुभम चौधरी, संघटकपदी अविनाश अडसुळ, रोहित माळी, पिंपरी विधानसभा संघटकपदी अनिकेत पाटील, (Pimpri News) उपविधानसभा संघटकपदी आशिष बाबर, अविनाश जाधव, सलमान पटेल, निजाम शेख, चिंचवड उपविधानसभा संघटकपदी नितीन पाटील, संग्राम धायरीकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर, युवा सेनेच्या मावळ जिल्हा संघटकपदी गिरीश सातकर, उपजिल्हा संघटकपदी दत्ता केदारी, तालुका संघटकपदी विशाल हुलावळे, उप तालुका मावळ युवा अधिकारी योगेश खांडभोर, नाणे उप तालुका मावळ अधिकारी नितीन देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहर युवती विस्तारक पदी शर्वरी गावंडे, चिंचवड विधानसभा संघटिकापदी श्वेता कापसे, चिंचवड उपविधानसभा संघटिकापदी वैष्णवी जाधव, समन्वयकपदी रितू कांबळे यांची निवड करण्यात आली. याशिवाय पिंपरी-चिंचवड व्यापारी सेलच्या अध्यक्षपदी किशोर केसवानी, चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत गांगड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार – बारणे

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”बाळासाहेबांची शिवसेनेची पदाधिकारी पक्षाचे काम जोमाने करतील. पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने पक्ष संघटन वाढविले जाईल. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. या निर्णयांचा तळागाळातील लोकांना लाभ मिळवून देण्याचे काम पक्षाचे पदाधिकारी करतील.  बाळासाहेबांची शिवसेनेचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवतील. आगामी महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत. पक्षाचे जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मित्र पक्ष भाजपसह आमची महापालिकेत सत्ता येईल” असा विश्वासही खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

ठाकरे यांची शिवसेना बॅकफुटवर, खासदार बारणेंसोबत प्रमुख पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत  

शिवसेनेची दोन गटात विभागणी झाली. उद्धव बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना अशा दोन शिवसेना झाल्या. मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाळासाहेबांच्या शिवसेनेत गेले आहेत. खासदार बारणे यांच्यासोबत शहरातील अनेक पदाधिकारी जोडले गेले आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेला पिंपरी-चिंचवड शहरात मोठा फटका बसला आहे. याचा आगामी महापालिका निवडणुकीवर देखील मोठा परिणाम होईल.

खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेत येण्याअगोदर शिवसेनेचे केवळ चार नगरसेवक होते. बारणे यांच्या प्रवेशानंतर शिवसेनेचे चार चे 14 नगरसेवक झाले.(Pimpri News) शिवसेनेत नेहमीच गटबाजी राहिली. त्याचा फटका 2017 च्या निवडणुकीत बसला.  आता खासदार बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत.  खासदार बारणे यांच्यासोबत एकही पदाधिकारी गेला नाही असे काहीजण म्हणत होते. पण, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी जाहीर झाल्यानंतर अनेक पदाधिकारी, शिवसैनिक हे शिंदे यांच्यासोबत गेल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे ठाकरे यांची शिवसेना शहरात बॅकफुटवर गेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.