Balewadi: पुणे महापालिकेकडून पॉझिटीव्ह पण लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी बालेवाडीत 500 बेडची व्यवस्था

दीड हजार बेडचे उदिष्ट. 500 beds made ready for asymptomatic Covid19 patients at Balewadi stadium Corona care centre

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून एक पाऊल पुढे टाकले आहे. बालेवाडी स्टेडीयम येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन  हॉल ताब्यात घेतला आहे. तिथे आवश्यक ते बदल करुन कोरोना पॉझिटीव्ह पण लक्षणे काहीच नसलेल्या रुग्णांसाठी 500 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईनंतर रुग्ण वाढण्याचा वेग पुण्यामध्ये आहे. पुण्यातील रुग्णालये कमी पडत आहेत. त्यासाठीच महापालिकेने बालेवाडी  स्टेडियम  येथील  बॅडमिंटन  हॉल  ताब्यात घेतला.

तिथे आवश्यक असलेले बदल केले आहेत. या  स्टेडियमपर्यंत  पोहोचणारा  मार्ग  एकलमार्ग  करण्यात  आला आहे. स्टेडियमच्या  आतील  सर्वसामान्यांचा वावर  बंद करण्यात आला आहे.

याठिकाणी पहिल्या टप्प्यात सुमारे 500 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सीसीटीव्ह कॅमेरे, अधिकारी, नियंत्रण व्यवस्थेकरिता  संगणक उपलब्ध करण्यात आला आहे. काही कर्मचा-यांचीही नियुक्ती केली आहे.

याबाबत कोथरूड  क्षेत्रीय  कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी संदीप कदम म्हणाले, ”भविष्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी बालेवाडीतील बॅडमिंटन हॉल ताब्यात घेतला आहे. त्याठिकाणी दीड हजार बेडची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.

पहिल्या टप्प्यात 500 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना पॉझिटीव्ह पण लक्षणे काहीच नाहीत अशा रुग्णांना येथे हलविण्यात येणार आहे. त्यासाठी तिथे डॉक्टरांसह कर्मचारी उपलब्ध केले जाणार आहेत. बाकीच्या विभागातील सेंटर पुर्ण झाले नाहीत. त्यामुळे सध्या याठिकाणी रुग्णांना ठेवले नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.