BNR-HDR-TOP-Mobile

Balewadi: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरातील औद्योगिकरणाला चालना देण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी फोडण्यास मदत करणा-या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (मंगळवारी) भूमीपूजन झाले.

श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पुरी, पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे उपस्थित आहेत.

हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कंपन्या आहेत. हिंजवडीला दररोज ये-जा करणा-यांची संख्या सुमारे दोन लाख आहे. परंतु, अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतुकीची सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने या 23.3 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. हा संपूर्ण मार्ग इलेव्हेटेड असणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये!
हिंजवडी ते शिवाजीनगर – 23 किलोमीटर मार्ग
एकूण स्थानके-23
प्रकल्पाची एकूण किंमत – 3 हजार 313  कोटी रुपये
भूसंपादनासाठी खर्च – 1 हजार 811 कोटी
केंद्र सरकार – 20 टक्के निधी
राज्य सरकार – 20 टक्के निधी जमिनीच्या स्वरूपात
खासगी कंपनी देणार – 60 टक्के निधी
सार्वजनिक – खासगी भागीदारी – पहिला प्रकल्प
प्रकल्पाचे काम – तीन वर्षांत पूर्ण करणार दोन मेट्रो धावणार (आठ डबे असलेल्या)
एकावेळी प्रवास – 33 हजार प्रवासी
रोजगार निर्मिती – एक हजार

HB_POST_END_FTR-A2

.