Balewadi: कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी ठरतेय वरदान, 1800 रुग्ण झाले बरे

Balewadi Covid Care Centre boon to asymptomatic covid19 patients. 1800 coronavirus positive patients cured. बालेवाडीतील कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) उपचार केले जात आहेत. दोन महिन्यात या सेंटरमध्ये उपचार घेवून 1800 रुग्ण ठणठणीत होऊन घरी गेले

एमपीसी न्यूज – कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह पण लक्षणे काहीच नसलेल्या रुग्णांवर पिंपरी महापालिकेने उभारलेल्या बालेवाडीतील कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) उपचार केले जात आहेत. दोन महिन्यात या सेंटरमध्ये उपचार घेवून 1800 रुग्ण ठणठणीत होऊन घरी गेले आहेत. डॉ. विनायक पाटील सेंटरची उत्तमरित्या जबाबदारी पार पाडत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संपूर्ण शहरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाने शहराला विळखा घातला आहे. शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सक्रिय रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे.

पालिकेने लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी बालेवाडी स्टेडीयम येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे 300 बेडचा क्वारंटाईन वार्ड तयार केला आहे. त्याला कोविड केअर सेंटर असे संबोधले जाते. 11 मे पासून हे सेंटर कार्यरत आहे.

काहीच लक्षणे नाहीत अशा रूग्णांना ठेवले जाते. दोन महिन्यात या सेंटरमधून तब्बल 1800 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता या सेंटरमध्ये 200 हून अधिक कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह पण लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

कोणतीही लस उपलब्ध नसताना कोरोना बाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवून इच्छाशक्ती प्रबळ केली जात आहे. डॉक्‍टर, नर्स यांच्याकडून योग्य उपचार व मार्गदर्शन रुग्णांना मिळत आहे.  अनेक रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. ही समाधानाची बाब मानली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like