Balewadi Crime News : ऑस्ट्रेलियावरुन गिफ्ट आल्याचे सांगून महिलेची 25 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑस्ट्रेलियावरुन गिफ्ट आल्याचे सांगून त्यासाठी वारंवार पैसे घेऊन विवाहित महिलेची तब्बल 25 लाखांची फसवणूक केली आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हर्षदा निलेश हळदिकर (वय 29, रा. बालेवाडी स्टेडीयम जवळ, म्हाळुंगे, मुळगाव मिरज, सांगली) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहीत मिहिलेला अनोळखी मोबाईल वरुन ऑस्ट्रेलियावरुन गिफ्ट आल्याची माहिती मिळाली. अनोळखी मोबाईल धारकाने महिलेचा व्हिडिओ कॉल व मेसेजच्या माध्यमातून विश्वास संपादन केला. त्यानंतर विवाहित महिला व तिचे सासरे यांच्या बॅंक खात्यावरुन आरोपीच्या वेगवेगळ्या बॅंक खात्यावर पैसे जमा केले.

महिलेने तब्बल 25 लाख 59 हजार 50 रुपये एवढी रक्कम आरोपीला पाठवली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणाचा हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदराज गभाले अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.