रविवार, जानेवारी 29, 2023

Balewadi News : रस्ता ओलांडत असताना अपघात, पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज- मुंबई- बँगलोर महामार्गावर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या पादचाऱ्याचा  उपचारादरम्यान (Balewadi News) मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.22) रात्री बालेवाडी येथे घडली.

बाळु बापु अवचरे (वय 32 रा.म्हाळुंगे) असे मयत इसमाचे नाव असून  गौतम बापु अवचरे (वय 34) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pimple Nilakh News : पिंपळे निलख येथे व्यावसायीकाच्या घरात घरफोडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ हे पायी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते जखमी झाले , वाहन चालक तेथे न थांबता पुढे निघून गेला. बापू यांना दवाखान्यात उपचारासाठी नेले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यावरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हिंडवडी पोलीस आरोपीचा शोध घेत (Balewadi News)आहेत.

Latest news
Related news