Balewadi : महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धेत किकबॉक्सिंगमध्ये सृष्टी पाटील हिला सुवर्णपदक

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धेत किडज् पॅराडाइज स्कूल चऱ्होली या शाळेची विद्यार्थिनी सृष्टी पाटील हिने किकबॉक्सिंग या खेळात सुवर्णपदक प्राप्त केले.

इयत्ता 6 वी मधील सृष्टी पाटील हिने 14 वर्षाखालील वयोगटामध्ये 24 किलो वजन गटात सुवर्णपदक तर इयत्ता 7 वी मधील ईश्वरी जपे हिने 14 वर्षाखालील वयोगटात 28 किलो  वजन गटात रौप्यपदक पटकावले. दोन्ही विद्यार्थ्यांनींच्या यशाबद्दल शाळेच्या वतीने शाळचे संचालक नवनाथ काळे, ऍड सचिन काळे यांनी कौतुक केले. सर्व विजयी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. क्रीडा शिक्षक संदेश साकोरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष अनंत काळे म्हणाले, “आमची शाळा शिक्षणाबरोबरच मुलांच्या सर्वागीण गुणांना वाव देत असते. शाळेचे अनेक विद्यार्थी राज्यस्तरावर खेळत असतात. सामाजिक बांधिलकी समजून शाळेच्या वतीने वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम, मुलांचा सर्वागीण विकास व्हावा म्हणून आठवडी बाजार असे उपक्रम राबवले जातात “

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.