Pune: कलाकारांनी पडदा उघण्यासाठी नटराजाकडे घातले साकडे

balgandharva rang mandir 53 rd anniversary celebration सालाबादप्रमाणे 26 जून रोजी दिमाखात उत्साहात साजरा करण्यात येणारा बालगंधर्व रंगमंदिराचा 53 वा वर्धापनदिन सोहळा यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरा झाला.

एमपीसी न्यूज- बालगंधर्व रंग मंदिराचा पडदा उघडून त्याचे पूजन करण्यात आले. तिथे रीतसर नारळ फोडण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले. हा पडदा लवकरच उघडावा यासाठी सर्वांनी नटराजकडे साकडे घातले.

सर्व कलाकारांनी नेहमीप्रमाणे बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिन निमित्ताने केक कापून साजरा केला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कलाकारांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवू व कलाकारांसाठी रंगमंच कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन सर्वांना दिले.

आनंददायी वातावरणात हा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी सर्व कलाकारांनी साजरा केला. सालाबादप्रमाणे 26 जून रोजी दिमाखात उत्साहात साजरा करण्यात येणारा बालगंधर्व रंगमंदिराचा 53 वा वर्धापनदिन सोहळा यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरा झाला.

कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूमुळे सर्व परिस्थिती लक्षात घेऊन व शासनाच्या आदेशानुसार व सर्व नियमांचे पालन करून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, अध्यक्ष मेघराज राजेभोसले, लक्ष्मीकांत खाबिया व परिवारातील मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते.

मेघराज राजेभोसले म्हणाले, बालगंधर्व रंग मंदिराचा वर्धापन दिन बालगंधर्व परिवारातर्फे 14 वर्षे साजरा केला जातो. हा सोहळा 3 दिवस साजरा होतो. पुण्यातील सर्व कला प्रेमींसाठी एक पर्वणी असते यात भावगीत, भक्तीगीतापासून लावणीपर्यंत सर्व कला आविष्कार साजरे केले जातात.

पुणेकरासाठी मोफत असलेला कार्यक्रम गेली 14 वर्षे साजरा केला जातो. अनेक आठवणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू असतात.

सकाळी जादूचे प्रयोग ,भावगीत,भक्तीगीत, लोकधारा, एकपात्री प्रयोग, महिलांसाठी लावणी, संगीत रजनी वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती, सिनेसृष्टीतील अनेक गाजलेले कलावंत या मोहोत्सवात आतापार्यंत सहभागी झालेले आहेत.

या महोत्सवाच्या माध्यमातून कलाकारांचा मेळावा पाहायला मिळायचा. तसेच सर्व कलाकारांच्या अडचणी असतील किंवा एकमेकांची विचारपूस करण्यासाठी तीन दिवस एकत्र असायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकत्रितपणे एखाद्या रंगमंदिराचा अशा प्रकारे वर्धापनदिन साजरा करणारे एकमेव पुणे शहर व बालगंधर्व रंगमंदिर असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.