Talegaon Dabhade News : ‘बालजत्रा व मनोरंजन नगरी’ला सर्व वयोगटातील नागरिकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने तळेगाव दाभाडे शहरात प्रथमच भव्यदिव्य स्वरुपात सर्वांसाठी मोफत आयोजित केलेल्या ‘बालजत्रा व मनोरंजन नगरी’ला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. सर्व वयोगटातील नागरिक जत्रेचा आस्वाद घेत आहेत. जत्रेला तळेगावकरांसह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज शनिवारी आणि उद्या रविवार अशी आणखी दोन दिवस जत्रा भरणार आहे.

कोरोनाच्या काळात दोन वर्षे मुलांना खेळांचा, यात्रांचा मनसोक्त आनंद घेता आला नाही. सध्या मुलांच्या शाळेला सुट्टी असल्याने ही गरज ओळखून बालजत्रा व मनोरंजन नगरीचे आयोजन केले आहे. तळेगाव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेज ग्राऊंडवर या जत्रेला गुरुवार (दि.26) पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत जत्रा सुरु असते. रविवार (दि.29) पर्यंत जत्रा सुरु राहणार आहे.

कुटुंबातील प्रत्येकासाठी मनोरंजन, विविध खेळणी, कार्टुन ट्रेन, बलून शुटींग, डान्स शो, मर्दानी खेळ, मॅजिक शो, महिलांसाठी लकी ड्रॉ व आकर्षक बक्षिसे मिकी माऊससह अनेक कार्टुन्स, म्युझिक धमाल, मस्ती, मनोरंजन आणि सेलिब्रिटी अँकर RJ अक्षय आदी बालजत्रा व मनोरंजन नगरी मधील सर्व खेळणी मोफत आहे. जत्रेत सर्वांना मोफत प्रवेश आहे. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल जत्रेत लागले आहेत. लहानमुलांसह कुटुंबातील सर्वांचेच जत्रेत मनोरंजन होत आहे. शाळांना सुट्टी असल्याने पालक मोठ्या सख्येने मुलांना घेऊन जत्रेत येत आहे. मुलांचेही मोठे मनोरंजन होत आहे. दंगा मस्ती करत, खेळत, बागडत मुले जत्रेचा आनंद घेत आहेत.

विविध पदार्थ चाखण्याची संधीही जत्रेत मिळत आहे. सर्वच वयोगटातील नागरिकांचा जत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तळेगावदाभाडेसह परिसरातील नागरिक मुलांसह जत्रेला येऊन आनंद घेताना दिसत आहेत. जत्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. सुट्टीच्या दिवशी म्हणजेच उद्या रविवारी जत्रेला मुलांसह नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पूर्णपणे नियोजन केले असल्याचे संयोजकांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.