Lonavala News : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती लोणावळ्यात साजरी

एमपीसी न्यूज : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष विशाल विकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही जयंती लोणावळा पत्रकार कक्षात साजरी झाली.

यावेळी लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पाटील, मावळ वार्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन पारख, नगरसेवक निखिल कविश्वर, नगरसेवक विशाल पाडाळे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. 

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष विशाल विकारी यांचा ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर व संजय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नुतन नगरसेवक विशाल पाडाळे यांचा सत्कार सचिन पारख व संजय आडसुळे यांच्या हस्ते करण्यात आला तर एमएन न्युज नावाचे नुतन चॅनल सुरू केल्याबद्दल संजय पाटील यांना सन्मानित करत शुभेच्छा देण्यात आल्या. भाजपाचे लोणावळा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांनी देखील नुतन अध्यक्ष व पत्रकार त्यांचा सन्मान केला.

 यावेळी नगरसेवक व पत्रकार निखिल कविश्वर, पत्रकार संघाचे सचिव प्रशांत पुराणिक, उपाध्यक्ष नितिन तिकोणे, बंडू येवले, संतोषी तोंडे, नरेश बोरकर, संदीप मोरे, सुनिल म्हस्के, गोपीनाथ मानकर हे उपस्थित होते. उपस्थित सर्व पत्रकारांना यावेळी गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी बोलताना नगरसेवक निखिल कविश्वर म्हणाले लोणावळा शहरातील सर्वच पत्रकारांनी आता पर्यत शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. शहरात समाजा समाजात तेढ निर्माण होईल अथवा कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे वागले नाही याचा मला सार्थ अभिमान आहे. रामविलास खंडेलवाल, कुमठेकर, पाडाळे यांनी देखील मनोगते व्यक्त केली.

लोणावळा शहराच्या विकासासाठी गेली चार वर्ष सतत कार्यमग्न असलेल्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी लोणावळा शहराला स्वच्छ करण्याचा ध्यास घेत शहराला सलग तीन वेळा देश पातळीवर पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळवून दिले. त्यांच्या या कार्याचा लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने गौरव करत त्यांना देखील सन्मानित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.