Sangli News : सांगली मधील बाळू लोखंडेची भंगारात विकलेली खुर्ची थेट इंग्लंडमध्ये

एमपीसी न्यूज :  बाळू लोखंडे असे नाव असलेल्या एका लोखंडी खुर्चीचा व्हिडीओ क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. इंग्लंडसारख्या देशात सांगलीमधील बाळू लोखंडे यांच्या खुर्च्या वापरल्या जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

 लोखडेंची खुर्ची इंग्लंडमध्ये कशी पोहोचली याचा मजेदार किस्सा समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील सावळज गावातील बाळू लोखंडे हे मागील अनेक वर्षांपासून मंडप डेकोरेटर्स म्हणून काम पाहतात. तेरा वर्षांपूर्वी त्यांनी जुन्या खुर्च्या भंगारामध्ये विकायला काढल्या होत्या.

या जुन्या खुर्च्या विकून त्यांनी प्लास्टिकच्या खुर्च्या खरेदी केल्या. इंग्लंडमधील एका व्यावसायिकाने या खुर्च्या खरेदी केल्या होत्या. नंतर या खुर्च्यां एका हॉटेल व्यावसायिकाने खरेदी केल्या. त्याने 15 खुर्च्या खरेदी केल्या होत्या. तेव्हापासून त्या खुर्च्या इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये एका कॅफेमध्ये वापरल्या जात आहेत.

दरम्यान, सुनंदन लेले यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर बाळू लोखंडे यांच्या खुर्च्यांची एकच चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे भंगारात घातलेल्या खुर्च्या इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये जाऊन पोहोचतील अशी कल्पानाही मी केली नव्हती असे लोखंडे सांगत आहेत. तेरा वर्षांनंतर खुर्चीने प्रसिद्धी मिळवून दिल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.