Ban Lipstick : मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टिक! मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या सोशल मिडीया पोस्ट व्हायरल

एमपीसी न्यूज – मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री यांनी सोशल मिडीयावर त्यांची एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टिक ! हा हॅशटॅग वापरला असून, हे नेमकं काय प्रकरण आहे, असा सवाल नेटकरी विचारत आहेत.

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे यांनी बॅन लिपस्टिक असा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आता अभिनेत्री प्राजक्ता माळी ही असाच संदर्भ असणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओ प्राजक्ता माळी ओठांना लावलेली लिपस्टिकही पुसून बॅन लिपस्टिक असे म्हणताना दिसत आहे. या सोबतच तिने मला लिपस्टिकचा रंग नको… मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही. बॅन लिपस्टिक!
I Support @tejaswini_pandit #BanLipstick असा हॅशटॅग सुद्धा दिला आहे.

 

 

दरम्यान, या व्हिडिओ मागचे नेमकं सत्य काय? हा त्यांच्या आगामी चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ आहे का? किंवा एखादा पब्लिसिटी स्टंट आहे? यावर सध्या इंस्टाग्रामवर बरीच मोठी चर्चा रंगलेली दिसून येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.