Ban On Chinese Apps: ‘या व्हायरसला पुन्हा कधीच परवानगी देऊ नका’, टिकटॉकवरील बंदीचे सेलिब्रेटिंकडून स्वागत

Ban On Chinese Apps: 'Never Allow This Virus Again', Celebrities Welcome TickTock Ban अभिनेता कुशाल टंडन आणि 'शक्ति-अस्तित्व के एहसास की'मधील अभिनेत्री काम्या पंजाबीने अ‍ॅपवरील बंदीच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

0

एमपीसी न्यूज- चीनबरोबर सीमेवर सुरु असलेल्या तणावादरम्यान भारत सरकारने मोठा निर्णय घेत 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. भारत सरकारने टिकटॉक, युसी ब्राऊजर आणि शेअर इटसह 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. निया शर्मा, कुशाल टंडन, काम्या पंजाबी आणि मनवीर गुर्जरसह अनेक टीव्ही सेलिब्रेटिंनी चिनी अ‍ॅप्सबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर टिकटॉक व्हिडिओमध्ये कंटेटच्या (आशय) गुणवत्तेवर वाद सुरु आहे. त्याचबरोबर टि्वटरवरही हॅशटॅग #TikTok ट्रेंड सुरु आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका नागिन-4 मधील अभिनेत्री निया शर्मा उर्फ वृंदाच्या मते, आता टिकटॉकला पुन्हा भारतात प्रवेश दिला जाऊ नये. तिने टि्वटरवर म्हटले की, आपल्या देशाला वाचवल्याबद्दल धन्यवाद, टिकटॉक नावाच्या या विषाणूला पुन्हा कधीच भारतात परवानगी दिली जाऊ नये.

‘बिग बॉस 10’ चा विजेता मनवीर गुर्जरने आपल्या टि्वटमध्ये टिकटॉकर्सवर निशाणा साधत म्हटले की, कॅरी मिनाटीच्या युट्यूब विरुद्ध टिकटॉक व्हिडिओला कोण विसरु शकतो ?

अभिनेता कुशाल टंडन आणि ‘शक्ति-अस्तित्व के एहसास की’मधील अभिनेत्री काम्या पंजाबीने अ‍ॅपवरील बंदीच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

संगीत दिग्दर्शक विशाल ददलानीनेही टि्वट करत टिकटॉकसह चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

भारतीय सुरक्षा संस्थांनी चायनीज अ‍ॅप्सची एक यादी तयार करुन केंद्र सरकारला यावर बंदी घालण्याची विनंती केली होती. एक तर या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा नागरिकांना त्वरीत हे अ‍ॅप्स आपल्या मोबाइलवरुन हटवावेत, अशी विनंती सुरक्षा संस्थांनी केली होती. चिनी कंपन्या भारताचा डेटा हॅक करु शकतात, असे यामागे कारण देण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like