Sangavi News : लोकांची संचारबंदी केली, मच्छरांचीही संचारबंदी करा

महापालिका म्हणतेय ठिकाण सांगा

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आजपासून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. याचाच दाखला देत

मच्छरांनी त्रस्त असलेल्या सांगवीतील एका तरुणाने लोकांची संचारबंदी केली. पण, या मच्छरांची संचारबंदी का होईना? कृपया मच्छरांचीही संचारबंदी करावी अशी उपरोधिक मागणी तरुणाने महापालिकेकडे ट्विटरद्वारे केली. त्यावर महापालिकेनेही प्रतिसाद देत नेमके ठिकाण सांगावे असे ट्विट केले.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीचे नदीपात्र लाभले असून नद्यांमध्ये बेसुमार जलपर्णी वाढलेली आहे. शहराच्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रासायनिक द्रव्ये, विनाप्रक्रिया नदीत सोडण्यात येणारे मैलापाणी, नाल्यांमधील प्रदूषित पाण्यामुळे जलपर्णीच्या विस्तारासाठी पोषक वातावरण निर्माण होते.

नदीचा नैसर्गिक समतोल ढासळत असून जलजीवसृष्टीवरही दुष्परिणाम जाणवत आहेत. नदीतील जलपर्णीमुळे शहरातील सर्व नागरिकांना डास आणि कीटकांचा त्रास सहन करावा लागत आहे. पिंपळेगुरव, सांगवीतील नदीकाठचे नागरिक डांसामुळे हैराण झाले आहेत. संध्याकाळी घराच्या बाहेर पडता येत नाही. एवढे मच्छर नदीकाठच्या भागात आहेत. नागरिक परेशान झाले आहेत.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आजपासून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. याचाच दाखला देत मच्छरांनी त्रस्त असलेल्या सांगवीतील अक्षय शितोळे या तरुणाने लोकांची संचारबंदी केली. पण, या मच्छरांची संचारबंदी का होईना? कृपया मच्छरांचीही संचारबंदी करावी अशी उपरोधिक  ट्विटरद्वारे केली. हे ट्विट महापालिकेलाही टॅग केले. त्यावर महापालिकेनेही प्रतिसाद देत नेमके ठिकाण सांगावे असे ट्विट करत उत्तर दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.