Sanjay Raut : राजकीय नेत्यांना संजय राऊत यांना भेटण्यास मज्जाव

एमपीसी न्यूज – पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आलेल्या एका खासदार आणि दोन आमदारांना परवानगी नाकारण्यात आल्याची माहीती आर्थर रोड जेल प्रशासनाने दिली. संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत.

 

शिवसेना नेते तसेच राजयसभा खासदार संजय राऊत यांचा मुक्काम आता येत्या 22 पर्यंत आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. ईडीने मनी लॅन्ड्रींग प्रकरणात त्यांना अटक केल्यानंतर राऊत यांना सोमवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 22 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.दरम्यान, त्यांना आज भेटण्यासाठी गेलेल्या दोन आमदार आणि एका खासदाराला कारागृह प्रशासनाने परवानगी नाकारली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.