Pune Crime News : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडू आंदेकरसह दोघांना अटक

एमपीसी न्यूज : टोळीचे वर्चस्व कमी होण्यास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून बंडू आंदेकर टोळीतील काही गुंडांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. 21 फेब्रुवारी रोजी गणेश पेठेतील महाराणा प्रताप शाळेशेजारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.

खडक पोलिस ठाण्यात या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बंडू अण्णा उर्फ सूर्यकांत रानोजी आंदेकर (वय 60) आणि वृषभ देवदत्त आंदेकर या दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी ओंकार गजानन कुडले (वय 21) याने खडक पोलिसात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी आंदेकर टोळी आणि ओंकार कुडले यांच्यात अनेकदा वादावादी झाली आहे. यामुळे आपल्या टोळीचे वर्चस्व कमी होत असल्याचा बंडू आंदेकर याचा समज होता. याच कारणावरून बंडू आंदेकर यांच्या सांगण्यावरून ओंकार कुडलेला पाच जणांनी पालघन, कोयता यासारख्या धारदार हत्याराने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

कुडले याने दिलेल्या तक्रारीनंतर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मंगळवारी रात्री उशिरा बंडु आण्णा आंदेकर आणि ऋषभ आंदेकर या दोघांना अटक केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.