Baner : घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि 20 हजारांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज-घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि 20 हजारांची रोकड असा दोन लाख 16 हजार रुपयांचा ऐवज (Baner)चोरी केला.बाणेर भागातील एका घरात ही घटना घडली.
या प्रकरणी अक्षय देशपांडे (वय 33, रा. गगनगिरी निवास, भैरवनाथ मंदिराजवळ, बाणेर) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Yerawada : उपविभागीय क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावात बुडून एकाचा मृत्यू
देशपांडे हे काही कामानिमित्त बाहेर गेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. कपाटातील सामान अस्ताव्यस्त करून सोन्याचे दागिने आणि 20 हजारांची रोकड चोरी करून चोरटे पसार झाले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रुपेश टेमगिरे करीत (Baner) आहेत.