Baner crime News : बाणेर येथे एक लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज – घराची कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी एक लाख पाच हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना 3 जानेवारी 2021 रोजी सकाळी उघडकीस आली असून याबाबत ८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज संभाजीराव देशमुख (वय 39, रा. सुस रोड, बाणेर) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशमुख यांचे घर 24 डिसेंबर 2020 ते 3 जानेवारी या कालावधीत कुलूप लावून बंद होते.

दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी देशमुख यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील कपाटामधून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.