Baner Crime News : ‘नेक्सा’च्या रिलेशनशिप मॅनेजरकडून शोरूमची साडे बारा लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – नेक्सा या नामांकित चारचाकी वाहनांच्या शोरूमच्या रिलेशनशिप मॅनेजरनेच शोरूमची साडे बारा लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई- बंगळूरू महामार्गालगत, बाणेर येथे असलेल्या शोरूमध्ये ही घटना घडली.

याप्रकरणी नेक्सा शोरूमचे एचआर मॅनेजर सागर कृष्णा बाठे (वय 34, रा. बाणेर) यांनी  हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश हनुमंत देसाई (वय 27, रा. आसंडोली, गगनबावडा, कोल्हापूर) याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश देसाई हा बाणेर येथील नेक्सा शोरूममध्ये नोकरीस होता. मारूती सुझुकीच्या चारचाकी गाड्यांना वेटिंग असल्याने त्या गाड्या लवकर मिळवून देतो व गाड्यांवर सूट देतो, असे प्रलोभन  त्याने ग्राहकांना दाखविले. तसेच   ग्राहकांकडून बुकिंगचे पैसे घेऊन स्वत:च्या गुगल पेच्या खात्यावर जमा करून घेतले.

ग्राहकांच्या मूळ पावत्या एडिट करून बनावट पावत्या त्याने ग्राहकांना पाठवल्या. अशा प्रक्रारे ग्राहकांकडून घेतलेले 12 लाख 46 हजार 363 रूपये त्याने स्वत:साठी वापरून कंपनीची फसवणूक केली.

पोलीस उपनिरिक्षक आहिरे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.