Baner : महामार्गालगत असलेल्या फर्निचर मॉलवर अतिक्रमणाची कारवाई; लाखो रुपयांचे नुकसान

एमपीसी न्यूज – कात्रज-देहूरोड बाह्यवळण (Baner) मार्गावर बाणेर येथे अनधिकृतपणे थाटलेल्या फर्निचरच्या आलिशान दुकानांवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. यामध्ये अनेक दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर बाणेर येथे महामार्गाच्या बाजूने अनधिकृतपणे अनेक फर्निचर दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे हे दुकानदार महापालिकेला कर देखील भरत नव्हते.

महामार्गालगत ही आलिशान दुकाने असल्याने अनेकदा या ठिकाणी वाहतूकीच्या अडचणी येत असत. ही अनधिकृत दुकाने काढून घेण्यासाठी पुणे महापालिकेने त्या दुकानदारांना मागील काही दिवसांपूर्वी नोटीसा दिल्या होत्या. मात्र त्या नोटिसांना दुकानदारांनी केराची टोपली दाखवली होती.

Chinchwad : पार्ट टाईम जॉब शोधताना सावधान

नोटीसा देऊन देखील हे दुकानदार प्रशासनाला झुगारत नसल्याने प्रशासनाने देखील कारवाईचा बडगा उगारला. गुरुवारी (Baner) सकाळी पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक पोलीस बंदोबस्तात फर्निचरच्या दुकानांसमोर हजर झाले. अतिक्रमण विभागाने फर्निचरच्या दुकानांवर थेट जेसीबी चालवून दुकाने जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली.

महापालिकेची कारवाई सुरु होताच अनेक दुकानदारांची पाचावर धारण बसली. काही दुकानदारांनी दुकानातील फर्निचर तत्काळ हटविण्याचे काम सुरु केले. तर काहींनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता ही कारवाई सुरु राहिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.