Baner : रन फॉर अमृतकाल स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – युवा उद्योजक आणि माजी  नगरसेवक सनी विनायक निम्हण ( Baner) यांच्या वाढदिवसानिमीत्त (20 फेब्रुवारी)सोमेश्वर फौंडेशनच्या वतीने आयोजित सुपर सनी विक” पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल स्पर्धेत धुलदेव घागरे, अर्चना आढाव, नागेश कारंडे,राणी मुलचंदानी यांनी अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मा. नगरसेवक सनी निम्हण, माजी भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले, रेस डायरेक्टर यश राईकर, एव्हरेस्टवीर किशोर धनकुडे, संयोजन समिती सचिव चंद्रकांत निम्हण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार  धनराज पिल्ले  म्हणाले,   फिट इंडिया , फिट महाराष्ट्र ,फिट पुणे बनवण्याच्या दृष्टीने पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकालचे आयोजन करून सनी निम्हण यांनी महत्वाची भूमिका बजावली. पुणेकरांनी मोठया प्रमाणात सहभाग घेत पुण्याला स्पोर्टस सिटी बनविण्याच्या दृष्टीने  महत्वाचे पाऊल टाकले  .

Rajyasabha Election : तीन राज्यांत राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान

चंद्रकांत पाटील म्हणाले,  मन शरीर आणि बुद्धी यांना चालना मिळावी या दृष्टीने ‘सुपर सनी विक’ चे आयोजन करत सनी निम्हण यांनी नागरिकांना व्यायामाकडे वळविण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट नियोजन करत सुंदर उपक्रम राबविला आहे.

10 किमी पुरुष गटात धुलदेव घागरेने 33 मिनिटे 08 सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर पंकज नेवासे (00 .33 .16 से) याने दुसरा, अभिजीत भस्मे(00 .33 .30 से) याने तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात अर्चना आढावने 39  मिनिटे 47 सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. थीर्धा गोपाकुमार के(00.40.22 से) व निशा पासवान(00.41.14 से) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

21  किमी पुरुष गटात नागेश कारंडे याने 01 .11 .09 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला. विकास पोळ(01 .13 00 से) याने दुसरा, निक्कू ऍथलेट्स(01 .13 . 29 से) याने तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात राणी मुलचंदानी(01.23.26 से) हिने विजेतेपद पटकावले. शितल तांबे(01 .39 .57 से)ने दुसरा आणि साजीनी रोशन(02 .04 .41 से) हिने तिसरा क्रमांक मिळवला.

स्पर्धेत 25000 धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील 21 किलोमीटर मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ 5.30 वाजता, तर 10 किलोमीटर अर्धमॅरेथॉन स्पर्धेचा फ्लॅगऑफ सकाळी 5:45 वाजता झाला. 21 किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी बालेवाडी स्टेडियम ते राधा चौक, बाणेर फाटा, औंध, विशालनगर मार्गे, बालेवाडी हायस्ट्रीट वरून पुन्हा बालेवाडी स्टेडियम असा मार्गक्रमण होता.स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक, पदक आणि आकर्षक अशी पारितोषिके देण्यात ( Baner) आली.

निकाल: प्रथम, द्वितीय व तृतीय या नुसार:
10किमी गट:पुरुष:1 .धुलदेव घागरे(००.33.08 से), 2 .पंकज नेवासे(00 .33 .16 से), 3 .अभिजीत भस्मे(00 .33 .30 से);
10 किमी गट:महिला: 1 .अर्चना आढाव(00 .39 . 47 से), 2 .थीर्धा गोपाकुमार के(00 .40 .22 से), 3 .निशा पासवान(00 .41 .14 से);
21  किमी गट: पुरुष:1. नागेश कारंडे(01 .11 .09 से), २.विकास पोळ (01 .13 .00 से), 3 .निक्कू ऍथलेट्स(01 .13 .29 से);
21  किमी गट:महिला:1 .राणी मुलचंदानी(01 .23 .26 से), 2 .शितल तांबे (01 .39 .57 से), 3 .साजीनी रोशन(02 .04 .41 से);

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.