Baner: उच्चभ्रू सोसायटीत मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होतं सेक्स रॅकेट

Baner: The sex racket was run under the name of massage center in highbrow society

एमपीसी न्यूज – पुढचा बाणेर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. चतुःश्रुंगी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी छापा टाकून चार मुलींची सुटका केली तर वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या एका महिलेसह दोघांना अटक केली.

या मसाज सेंटरची मालकीण ज्योती बनसोडे (वय 31) आणि व्यवस्थापक अमर दत्तू कांबळे (वय 35) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बाणेरमधील ‘द मिंट’ या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर चतुःश्रुंगी पोलिसांनी शनिवारी रात्री साडेनऊ वाजता छापा टाकून ही कारवाई केली.

पोलिसांनी यावेळी वेश्या व्यवसाय करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.