Republic Day parade : प्रजासत्ताक दिनी राजपथावरील परेडमध्ये बांग्लादेशचे जवान सहभागी होणार

0

एमपीसी न्यूज : कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारताचा दौरा रद्द केला आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जॉन्सन सहभागी होणार होते. जॉन्सन यांचा दौरा रद्द झाला असला तरी बांग्लादेशच्या जवानांची एक तुकडी यंदा प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या राजपथावरील परेडमध्ये सहभागी होणार आहे. 

भारतीय उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार बांग्लादेश सशस्त्र दलाच्या 122 कर्मचाऱ्यांची एक तुकडी भारतीय वायुसेनेच्या C-17 या विशेष विमानाने येत आहेत. 1971 च्या यद्धात भारतीय जवानांच्या बरोबरीने बांग्लादेशच्या या जवानांनी शौर्य दाखवत विजय मिळवला होता. आपल्या बहाद्दुर सैनिकांचा वारसा पुढे नेत ही तुकडी 26 जानेवारीला अर्थात प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होणार आहे.

एखाद्या विदेशी सैन्याच्या तुकडीला आपल्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडमध्ये सहभागी करुन घेण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी फ्रान्स आणि UAEच्या तुकड्या राजपथावरील परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.