Sangvi : ग्राहकांच्या बँकेची गोपनीय माहिती चोरून ड्रायफ्रूट विक्रेत्याने केली ग्राहकांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ड्रायफ्रूट विक्रेता ग्राहकांना एटीएमने पैसे देण्यास सांगत होता. ग्राहकांचे एटीएम कार्ड स्वाईप करून स्किमरच्या साहाय्याने ग्राहकांच्या बँकेची गोपनीय माहिती चोरली. त्याआधारे ग्राहकांच्या खात्यातून हजारो रुपये काढून घेतले. हा प्रकार 29 नोव्हेंबर ते 27 डिसेंबर 2018 या कालावधीत औंध हॉस्पिटल समोर रावेत रोडवर घडली.

संजय माणिकराव सांगेकर (वय 34, रा. भाऊनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शहाबुद्दीन उर्फ बबलू महमूद खान (रा. स्वराज कॉलनी, नडेनगर, काळेवाडी) व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शहाबुद्दीन याने ड्रायफ्रूट विक्रीचा बहाणा करून ड्रायफ्रूटचे पैसे एटीएम कार्डच्या माध्यमातून घेतले. ग्राहकांचे एटीएम स्वाईप करताना कार्डवरील माहिती पासवर्ड स्किमरच्या साहाय्याने चोरून घेतली. त्या माहितीचा वापर करून आरोपीने फिर्यादी संजय आणि अन्य काही ग्राहकांच्या बँक खात्यातून हजारो रुपये काढून ग्राहकांची फसवणूक केली. फिर्यादी संजय यांच्या खात्यातून 30 हजार रुपये तसेच अन्य एक ग्राहक गणेश दिगंबर सूर्यवंशी यांच्या खात्यातून 9 हजार रुपये काढून घेतले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.