Pune : ‘पीएमसी’ बँक भाजपचा नोट बंदीनंतर दुसरा घोटाळा – गौरव वल्लभ

एमपीसी न्यूज – नोट बंदीनंतर पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) हा भाजपचा दुसरा घोटाळा असल्याचा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला. या बँकेत सामान्य माणसाने 1-1 पैसा टॅक्स देऊन जमा केला. त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे काढता आले पाहिजे. या बँकेतील घोटाळ्याचा परिणाम राज्यातील इतर को-ऑपरेटिव्ह बॅंकांवर होणार आहे. त्याबाबत केंदीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन का बोलत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेस भवन येथे रविवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी गौरव वल्लभ बोलत होते. यावेळी, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड उपस्थित होते.

गौरव वल्लभ म्हणाले हाऊसिंग सोसायटी आणि महाराष्ट्रातील काही को – ऑपरेटिव्ह बँकांचा ठेवी या बँकेत आहेत. दिनांक 23 सप्टेंबरपर्यंत या बँकेचा व्यवहार व्यवस्थित होता. त्याच दिवशी केवळ 1 हजार बँकेतून काढता येणार? असे आदेश रिझर्व्ह बँकेने का दिले? 25 सप्टेंबर ला 10 हजार काढता येणार, परत असे का म्हटले, आरबीआयची कोणती चूक झाली? याचा खुलासा करण्यात यावा. तसेच, मुलुंडमध्ये 4 वेळा आमदार राहिलेला सुपुत्र या बँकेत डायरेक्टर असल्याचा आरोपही त्यांनी केला. या बँकेचे बोर्ड डायरेक्टर बरखास्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

बँकिंग, एज्युकेशन संकट वाढते आहे. जेवढे जास्त शिकाल, तेवढे बेरोजगार होतील अशी परिस्थिती आहे. मागील 3 वर्षांत सव्वातीन कोटी रोजगार गेले. अमेरिकेत जाऊन मोदींजींनी ‘हाऊडी’ केले, त्यातून देशाला काय मिळाले? मनमोहन सिंग ज्यावेळी अमेरिकेत जायचे, त्यावेळी ‘न्यूक्लियर’ वर चर्चा करायचे, अशी आठवण ही वल्लभ यांनी करून दिली. युवा, शेतकरी, महिलांना मोदींजींची हाउडीची अपेक्षा आहे. आज सर्वच क्षेत्रात मंदी आहे. मोटारसायकल, कार, साधी सायकल ही विकली जात नाही.

मोदीजी प्रचार के सीवा क्या करते है?
काँग्रेस बात कम ज्यादा काम करती है, मोदीजी प्रचार के सीवा क्या करते है? असा सवालही वल्लभ यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँगेसचे सर्वच वरीष्ठ मंडळी सहभागी होणार आहेत. आपल्या पक्षाचे लोक घाबरून पक्ष सोडून जात आहे, असा सवाल केला असता, सीबीआय, ईडीने घाबरविले असते, तर निवडणूकच झाली नसती. आमचा सत्तेच्या काळात ‘सत्यम’ घोटाळा समोर आला होता. त्यावेळी आम्ही लगेच कारवाई केली. अशी भाजप का करीत नाही? असा सवाल वल्लभ यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.