Pune : गहूंजे मैदानावर बँक ऑफ महाराष्ट्रचा ताबा ; MCA ने थकवले कर्जाचे हफ्ते  

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्याच्या गहुंजे मैदानाचा, बँक ऑफ महाराष्ट्रने प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. मैदानाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बँक ऑफ महाराष्ट्रकडून 69.50 कोटींचं कर्ज घेतलं होतं. मात्र या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने ही कारवाई केल्याचं समजतं आहे. मात्र या कारवाईचा क्रिकेटवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिवांनी सांगितलं आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र, कर्नाटक बँक, बँक ऑफ बडोदा आणि आंध्र बँक या 4 शाखांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला 69.50 कोटींचं कर्ज मंजूर केलं होतं. या बँकाच्या मंडळाचं नेतृत्व बँक ऑफ महाराष्ट्र करत असून, योग्य वेळेत हप्ते न भरल्यास मैदानाचा ताबा घेण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.