Pune News : ‘आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार आहोत’

पुण्यात झळकला प्राण गमावलेल्या गव्याची माफी मागणारे बॅनर

एमपीसी न्यूज – माणसांच्या जंगलात प्राण गमावलेल्या गव्याची माफी मागणारे बॅनर पुण्याच्या रस्त्यावर लागले असून पुण्याच्या रस्त्यावर रानगव्याची प्रतिकृती उभारली आहे. मुरुडकर झेंडेवाले म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश मुरुडकर यांच्या उपक्रमातून प्राण गमावलेल्या रानगव्याची माफी मागितली आहे.

भारत फ्लॅग फाउंडेशन चे अध्यक्ष गिरीश मुरुडकर यांनी मुरुडकर झेंडेवाले या पासोड्या विठोबाजवळील दुकानात ही प्रतिकृती उभारली आहे. ‘घटनेचे गांभीर्य ओळखुया, निसर्गात ढवळाढवळ थांबवूया’ असा शोकसंतप्त संदेश भारत फ्लॅग फाउंडेशनने या प्रतिकृती जवळ लावला आहे . पुणेकरांच्या नजरा ही प्रतिकृती वेधून घेत आहे.

 

बुधवारी (दि.9) कोथरूडमध्ये रा गव्याने माणसांच्या गर्दीला, त्यांच्या पाठलागाला घाबरून प्राण गमावल्यावर हळहळ व्यक्त झाली होती. आज ‘आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार आहोत’ असं लिहिलेले बॅनर लावून मुरुडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत . ‘जंगले राखुया, वन्यजीव जगवूया’ असा संदेशही गिरीश मुरुडकर यांनी प्रतिकृती जवळ लिहिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.