Baner News : चौदाव्या मजल्यावरून पडून बावीस वर्षीय कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : चौदाव्या मजल्यावर काम करत असताना (Baner News) खाली कोसळल्याने एका बावीस वर्षीय बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. बाणेर येथील कल्पतरू झेड या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर रोजी घटना घडली. श्याम नेमा (वय 22) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ठेकेदार लज्जाराम गुजर, सुपरवायझर रामकिस गुजर आणि सेफ्टी ऑफिसर रवी गवंडे,अजिंक्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात मयत व्यक्तीचा भाऊ देवेंद्र कुमार नेमा यांनी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, बाणेर परिसरातील पॅन कार्ड रोडवर सुरू असलेल्या या बांधकाम साइटवर श्याम नेमा हा काम करत होता. चौदाव्या मजल्यावर ओपन बाल्कनीवर स्टाईल फरशी बसवण्याचे काम करत असताना तो खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. दरम्यान इमारतीच्या ठेकेदार आणि सुपरवायझरने सुरक्षिततेच्या दृष्टीतून कोणतीही उपाययोजना न करता सेफ्टी बेल्ट व सुरक्षा जाळी न बसवता शाम नेमा याला काम करण्यास भाग पाडले. त्यामुळे काम करत असताना खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला (Baner News) असा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Jejuri News : दरोड्यातील आरोपींना अवघ्या 24 तासात अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.