PimpleGurav : वटवृक्षांनी सोडला मोकळा श्वास

एमपीसी न्यूज –  मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून पुरुषांच्या वतीने वटपौर्णिमा साजरी केली जाते. त्यानंतर संस्थेच्या वतीने पिंगळे गुरव, नवी सांगवी,  सांगवी परीसरातील महिलांनी वटवृक्षाला सूत, आंब्याचा नैवेद्य, धान्य वाहिले जाते,  त्यानंतर ते तसेच राहते या सुताचे योग्य ठिकाणी विसर्जन करण्याचा उपक्रम मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने केला जातो.

याबाबत माहिती  देताना  मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे अध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, पावसाळी दिवस आसल्याने तेथे दुर्गथी पसरते, आणि सूतामध्ये माती जाऊन बसते त्यामुळे  रोगराई पसरते .याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे नागरिक आजारी पडतात. व झाडांची वाढ खुंटते, याचे गांभीर्य लक्षात घेऊन. झाडांना बांधलेले सूत कापुन टाकून त्याचे योग्य त्या ठिकाणी विर्सजन केले. आम्ही गेल्या चार वर्षांपासून हे काम करत असल्याचे त्यांनी  सांगितले.

यावेळी  शहराध्यक्ष  अण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड सहसचिव गजानन धाराशिवकर, युवक सचिव, अक्षय जगदाळे, मुरलीधर दळवी, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, पंडित हनुमंत, प्रकाश बंडेवार, जनाबाई ईतापे, श्रीनिवास पानसरे, येळवे मल्हारराव, एल्लापा पौगुडवाले, सचिन सागवे, रविंद्र सुर्वे आदींनी सहभाग नोंदवला .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.