Pimpri Ganesh Festival News : ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत, औद्योगिकनगरीत उत्साहाला उधाण

एमपीसी न्यूज – गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया…, आले रे आले वाजत-गाजत बाप्पा आले… अशा जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाचे मोठ्या भक्ती भावाने आज (शुक्रवारी) आगमन झाले. सलग दुसर्‍या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असून अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी बाप्पाचे आगमन झाले असून औद्योगिकनगरीत उत्साहाला उधाण आले आहे.

गणेशोत्सावाला आजपासून सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात बाप्पाच्या आगमाने वातावरण भक्तीमय झाले. शहरातील विविध भागातील सार्वजनिक मंडळासह घरोघरी  गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून घरोघरी बच्चे मंडळी, महिला, अबालवृध्द तयारी करत होते. विद्युत माळा, फुले, मकर, छत, गौराईसाठी लागणारे सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी पिंपरी बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती.

शुक्रवारी सकाळी पुजेचे साहित्य खरेदी करण्यासह बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जाण्याची नागरिकांची लगबग सुरू होती. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी वाजत-गाजत गणरायाची विधीवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली.

चिंचवडगावातील गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या 43 व्या सार्वजनिक गणेशाची प्रतिष्ठापना ह.भ.प. जनार्दनमहाराज शेळके यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता करण्यात आली. या प्रसंगी नगरसेवक भाऊसाहेब भोईर,  शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळाचे अध्यक्ष विक्रांत ओतारी, संजय भळगट, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सदस्य विपुल नेवाळे, गोपी बाफना, बबलू गाडे, मामा घुमे, अमित चौधरी, इक्बाल शेख, कुमार झेंडे, नंदू वर्मा, चंद्रकांत देव, महेश गावडे यांची उपस्थिती होती.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.