Baramati : खुद्द शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना भरवला केक;व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Baramati: Sharad Pawar himself filled the cake for Dhananjay Munde; video goes viral on social media

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना केक भरवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे या स्वतः पवारांना आग्रह करून मुंडे यांना केक भरवण्याचे आवाहन करीत असल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे.

मुंडे यांचा 15 जुलैला वाढदिवस होता. त्यानंतर मुंडे यांनी गुरुवारी थेट बारामती गाठली. खुद्द शरद पवार यांनीच आज हसत हसत मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पवारांचे हे प्रेम बघून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

‘करोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली. सुप्रिया ताईंनी काल झालेल्या वाढदिवसानिमित्त केक आणला होता. राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब आहे. या कुटुंबाचा ‘आधारवड’ कायम आमच्या मागे भक्कम उभा असतो.

_MPC_DIR_MPU_II

धन्यवाद साहेब, ताई! असाच आशीर्वाद राहू द्या,’ अशा भावना मुंडे यांनी ट्विटरवरवरून व्यक्त केल्या.आणि सोबतचे फोटोही शेअर केले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून चुलत बहीण पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा पराभव करून धनंजय मुंडे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.

त्यानंतर ते शिवसेना – राष्ट्रवादी- काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंडे कॅबिनेट मंत्री झाले.

राष्ट्रवादीची मुलुख मैदान तोफ म्हणून त्यांची ओळख आहे. ते बोलायला लागल्यावर असंख्य नागरिक त्यांचे भाषण शांतपणे ऐकत असतात. मुंडे यांची आक्रमक शैली नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.