Baramati : बावधन परिसराची पालिका अधिकाऱ्यांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज : बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati) बावधन परिसरात आज स्ट्रीट लाईट, उद्यान, रस्ते आदी सुविधांबाबत महापालिका व एनएचएआयचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मराठा मंदिर लगतच्या फुटपाथची पाहणी केली. हा फुटपाथ तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करून तसेच त्यालाच लागून असलेल्या कॉर्नरवर ज्येष्ठ नागरिकांना चालता येईल अशा स्वरूपाचा ट्रॅक करण्याच्या दृष्टीने पाहणी केली.

मराठा मंदिर ते एल एम डी चौक रस्त्यावर मंजूर झालेल्या गतिरोधकांचे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबतही या सर्वांनी एकत्र पाहणी केली. यासोबतच नॅशनल हायवे लगतच्या कॉर्नर रोड वरील सोसायटीसाठी स्ट्रीट लाईट बसविण्याबाबत पाहणी केली.

महत्त्वाचे म्हणजे साऊंडप्रुफ बॅरिकेड्ससाठीच्या शक्यतांची देखील यावेळी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या भागात काम करीत असताना परिसरातील ‘ला वेला कासा’ या सोसायटीमधील सोलर पॅनलवर दगड पडून पॅनेलचे नुकसान झाले आहे. याबाबतची नुकसानभरपाई देण्याबाबतही यावेळी पाहणी करण्यात आली.

Bye-Election : कसबा, चिंचवडची निवडणूक ‘मविआ’ एकत्रित लढणार; उद्या उमेदवार जाहीर होणार

मुख्य हायवेला दोन्ही बाजूला लावलेले क्रॅश बॅरियर्सची या पथकाने पाहणी केली. सगुण निसर्ग सोसायटीच्या गेटवर पाणी साठते. याबाबतची देखील पाहणी करण्यात आली असून (Baramati) येणाऱ्या पावसाळ्यामध्ये गेटवर पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यायचे ठरले.

यावेळी मनपाचे अधिकारी, वॉर्ड ऑफिसर, अभियंते,एन एच ए आय चे अधिकारी, कुणाल वेडे-पाटील, बीसीएफ चे मनीष देव, अतुल पाटील, कृष्णन. निसर्ग सोसायटीचे कोठारी व इतर सदस्य आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.