Baramati: लॉकडाऊनचे पालन न केल्यामुळे न्यायालयाने केली तिघांना शिक्षा

एमपीसी न्यूज – बारामती तालुक्यात विविध ठिकाणी लॉकडाऊनचे पालन न केल्याबाबत न्यायालयाने तीन आरोपींना दोषी ठरवून प्रत्येकी तीन दिवस कैद किंवा 500 रुपये दंडाची शिक्षा दिली आहे. लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल न्यायालयाने शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच घटना आहे.

_MPC_DIR_MPU_II

बारामती तालुका पोलीस स्टेशनने या संदर्भात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. भारतीय दंड विधान कलम 188 नुसार अफजल बनीमिया आत्तार (वय 39, रा. श्रीरामनगर ता.बारामती), चंद्रकुमार जयमंगल शहा (वय 38, रा.सूर्यनगरी, ता.बारामती) व अक्षय चंद्रकांत शहा (वय 32, रा.वडगाव निंबाळकर ता.बारामती) अशी शिक्षा झालेल्या दोषींची नावे आहेत.

ही शिक्षा थोडी किंवा छोटी वाटत असली तरी या व्यक्तीवर भविष्यकाळात चारित्र्य पडताळणीमध्ये शिक्षा झाली म्हणून कोणतीही शासकीय किंवा खाजगी नोकरी मिळणार नाही. त्याचबरोबर भविष्यकाळात पासपोर्ट, शस्त्र परवाना, व्यवसाय परवाने मिळताना मोठी अडचण निर्माण होणार आहे. आपल्या थोड्या चुकीमुळे आपले स्वतःचे भविष्य अंधारात टाकणारे हे पाऊल आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या स्वतःच्या घरात बसून गंभीरपणाने लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.