Baramati : वेंकय्या नायडू आणि उमा भारती यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरोधात बारामतीत गुन्हा

Crime in Baramati against those who posted offensive posts about Venkaiah Naidu and Uma Bharti : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते वैभव सोलनकर यांनी याबाबत फिर्याद दिली

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा फोटो वापरुन आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्यावर बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते वैभव सोलनकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पुजा झोळ या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आली असल्याचे सोलनकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

यावरून बारामती तालुका पोलिस ठाण्यात भादवि कलम 505 (2) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व माजी मुख्यमंत्री भारती यांच्याविरोधात अपशब्द वापरून त्यांचा अपमान करण्याचा हा खेदजनक प्रकार आहे. देशातील ज्येष्ठ नेत्यांविरोधात केलेली अश्लील शेरेबाजी करुन दोन गटात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सोलनकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.