Baramati Crime News : क्रूरता ! सहा महिन्याच्या बालिकेला पाण्यात बुडवून ठार मारले

एमपीसीन्यूज : एका सहा महिन्याच्या चिमुरडीला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारण्यात आले. आज, बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपाली झगडे ही महिला बारामती तालुक्यातील माळेगाव येथे माहेरी बाळंतपणासाठी आली होती. दीपाली यांनी त्यांच्या सहा महिन्याच्या चिमुरडीला पाळण्यात झोपवले होते.
मात्र, दुपारनंतर ही चिमुरडी अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी शोधाशोध केल्यानंतर एका पाण्याच्या टाकीत तिचा मृतदेह आढळला.
घरापासून 40 फूट अंतरावर लांब असलेल्या या पाण्याच्या टाकीत ही चिमुरडी कशी गेली, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दिपाली झगडे यांना यापूर्वी दोन्ही मुलीच आहेत. तिसरे अपत्य ही त्यांना मुलगी झाले होते. घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेतला.
बारामती पोलीस अधिक तपास करीत आहेत.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.