Baramati Crime News : अर्धवट जळालेला पुरुषाचा मृतदेह आढळल्याने बारामतीत खळबळ

एमपीसीन्यूज ; बारामती तालुक्यातील एका स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मेखळी बकरवाडी येथील स्मशानभूमीत हा मृतदेह आढळला. या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही, परंतु अतिशय वाईट अवस्थेत हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. याची माहिती मिळाल्यानंतर मेखळी गावच्या पोलीस पाटलांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत व्यक्तीचे वय अंदाजे तीस वर्षे इतकी आहे.

पोलीस पाटील स्मशानभूमीत पोहोचले असता त्यांना मृतदेहावरील कपडे जळत असल्याचे निदर्शनास आले.

मयत व्यक्तीची ओळख अद्यापही पटली नाही. खून करून मृतदेह डिझेल टाकून जाळला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.