Baramati Crime News : जुगार अड्यावर छापा; 16 जणांवर गुन्हा, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – माळेगाव, बारामती या ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्यावर बारामती पोलिसांनी छापा टाकला. रविवारी (दि.13) दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जब्बल 15 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानेदेव विष्णु क्षिरसागर यांनी बारामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 16 जणांवर मुंबई जुगार प्रितिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेगावच्या हद्दीत गोसावी वस्ती याठिकाणी तीन पत्तीचा जुगार अड्डा सुरु होता. पोलिसांना माहिती मिळता त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला. 16 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 13 हजार 950 रोख रक्कम, 7 हजार 900 रूपयांची जुगाराची साधने, एक लाख किंमतीचे मोबाईल फोन, चार दुचाकी व दोन चारचाकी यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक ढवाण अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.