_MPC_DIR_MPU_III

Baramati Crime News: प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा दिराच्या मदतीने खून

एमपीसी न्यूज – प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने दिराच्या मदतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील एका गावातून उघडकीस आला. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

रामदास विठ्ठल महानवर (वय 27) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर या खून प्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी व त्याचा भाऊ या दोघांना अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये रामदास महानवर (वय 27) हा बेपत्ता झाल्याची फिर्याद त्याचा भाऊ गणेश याने 25 नोव्हेंबर रोजी दिली होती.
या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना बारामती तालुक्यातील कुतवळवाडी येथील एका विहिरीत रामदास महानवर याचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह बाहेर काढला असता त्याच्या पोटाला भला मोठा दगड बांधल्याचे दिसून आले होते. तसेच त्याच्या डोक्यावर गंभीर वारही करण्यात आले होते.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता रामदास याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह विहिरीत टाकल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.
_MPC_DIR_MPU_II
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना मयत व्यक्तीचा भाऊ आणि त्याची पत्नी हे दोघे विसंगत माहिती देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आहे. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना पोलिसी खाक्या दाखवत विचारपूस केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली.
मयत रामदास महानवर याची पत्नी ताई आणि गणेश यांच्यात दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेम संबंधांमध्ये गणेश हा अडसर ठरत होता. त्यामुळे दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचे ठरवले.
त्यानुसार दोघांनी संगनमताने डोक्यात दगड घालून रामदास याचा खून केला आणि नंतर त्याच्या पोटाला दगड बांधून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.